बॅगेत भरून घेऊन जातात लोक
जगात अशा अनेक नद्या आहेत, ज्या स्वतःचा आकार आणि स्वरुपावरून आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा, नील, अमेझॉन या प्रमुख नद्यांना पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असतात. सर्वसाधारणपणे नद्यांमध्ये पाणी वाहत असते, पण आम्ही आमच्या नद्यांना इतकं प्रदूषित करून ठेवलंय की त्या पाण्यासोबत प्लास्टिक, कचरा, रसायनांसारखे अनेक प्रकार वाहत आहेत. तर दुसरीकडे पाण्यासोबत सोने वाहणारी एक नदी आहे.
थायलंडमध्ये एक अशी नदी आहे, ज्यात पाण्यासोबत सोने देखील वाहते. याचमुळे नदीच्या काठावर परिसरात राहणाऱया लोकांची गर्दी दिसून येते. सोन्याच्या शोधात दूरवरून लोक येतात. या नदीला सुवर्ण नदी देखील म्हटले जाते आणि ती थायलंडच्या गोल्ड माउंटेन भागात वाहते.
हे ठिकाण थायलंडच्या दक्षिण भागात असून त्याची सीमा मलेशियाला लागून आहे. या भागात दीर्घकाळापासून सोन्याचे खनन होत आहेत. याचमुळे नदीच्या पाण्यात सोन्याचे अनेक छोटे तुकडे दिसून येतात. नदीतील गाळात सोन्याचे अवशेष मिसळलेले आहेत. आसपास राहणारे लोक नदीतील गाळ चाळण्याचे काम करतात आणि मिळालेले सोने घेऊन घरी परततात. अशा स्थितीत ही नदी अनेक लोकांसाठी उत्पन्नाचे साधन ठरली आहे.
अनेक लोक दररोज येथे येऊन येथील गाळातून सोने मिळवितात आणि ते विकून घर चालवितात. दैनंदिन खर्च भागेल इतके उत्पन्न यातून मिळते. 15 मिनिटांची मेहनत केल्यास सुमारे 244 रुपयांची कमाई होते असे एका महिलेने म्हटले आहे.