इस्लामाबाद
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या प्रमुखाची अधिकृत स्वरुपात नियुक्ती झाली आहे. लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांना डीजीच्या स्वरुपात आयएसआयची धुरा सोपविण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरपासून अंजुम हे पद सांभाळणार आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी अधिसूचनेनुसार विद्यमान आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद 19 नोव्हेंबरपर्यंत या पदावर राहणार आहेत. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासोबत बैठक घेतली आहे. आयएसआयच्या नव्या प्रमुखांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर इम्रान खान आणि बाजवा यांच्यात तणाव निर्माण झाला होता. आयएसआयचे नवे प्रमुख लेफ्टनंट जनरल अंजुम हे पाकिस्तानी सैन्याच्या पंजाब रेजिमेंटचे आहेत.