ऑनलाईन टीम/तरुण भारत
केरळमधील नन बलात्कार प्रकरणातून माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा सत्र न्यायायात या प्रकरणावर सुनावणी झाले. न्यायाधीश जी गोपाकुमार यांनी बिशप यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं. २०१८ मध्ये २८ जून रोजी एका ननने पोलिसात बलात्कार प्रकरणी जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्याविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणी न्यायालयाने ८३ साक्षीदार आणि ३० हून अधिक पुरावे तपासले. बिशप फ्रँको यांना २१ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणी एप्रिल २०१९ मध्ये आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र अटकेनंतर ४० दिवसातच फ्रँको यांना जामीन मिळाला होता.