आर्थिक वर्षाच्या अंतिम दिवशी सेन्सेक्समध्ये नकारात्मक वातावरण
वृत्तसंस्था /मुंबई
आर्थिक वर्षातील (2021-22) अंतिम दिवशी भारतीय भांडवली बाजारात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स नफा वसुलीमुळे घसरणीत राहिल्याचे दिसून आले. बाजाराने प्रारंभीची तेजी गमावत अंतिम क्षणी घसरणीसह बंद झाला आहे. तीन दिवसांच्या तेजीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेमध्ये नफा वसुली झाल्यामुळे बाजार प्रभावीत झाला होता.
चढ-उताराच्या कालखंडात सेन्सेक्स 115.48 अंकांनी घसरुन 58,568.51 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 33.50 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,464.75 वर बंद झाला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये बीएसई सेन्सेक्स 9,059.36 अंकांनी म्हणजे 18.29 टक्के, तर एनएसई निफ्टी 2,774.05 अंकांनी म्हणजे 18.88 टक्क्यांनी मजबूत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
काय म्हणतात अभ्यासक
साधारणपणे आर्थिक वर्ष 2021-22 च्या अंतिम दिवशी बाजारात नरमाईचा कल राहिला होता. मात्र निफ्टी 19 टक्क्यांनी लाभात राहिल्याचे दिसून आले. धातू आणि मीडिया यांनी 50 टक्केपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 यांनी वर्षाला 25 टक्के परतावा दिला आहे. हा लाभ तेव्हा मिळाला आहे. जेव्हा विदेशी गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात विक्री केली. हीच बाब देशातील गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत करणारी ठरली आहे.
गुरुवारी महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, आयटीसी आणि टायटन लाभात राहिले होते. तर अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, डॉ. रेड्डीज लॅब, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस हे नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 5.09 टक्क्यांसह घसरुन 107.68 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 808
- हिंदुस्तान युनि… 2048
- ऍक्सिस बँक…….. 707
- इंडसइंड बँक……. 935
- भारती एअरटेल… 755
- आयटीसी……….. 350
- टायटन………… 2535
- नेस्ले………….. 17340
- टीसीएस………. 3738
- टेक महिंद्रा……. 2499
- पॉवरग्रिड कॉर्प…. 216
- एचडीएफसी….. 2388
- बजाज फायनान्स 7259
- एशियन पेन्ट्स.. 3081
- आयसीआयसीआय 730
- मॅरिको…………… 503
- कॉन्टिनिअर कॉर्प. 671
- बंधन बँक……….. 306
- जेएसडब्ल्यू स्टील. 732
- अशोक लेलँड……. 117
- ब्रिटानिया…….. 3204
समभाग घसरलेल्या कंपन्या
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2633
- विप्रो…………….. 592
- डॉ.रेड्डीज लॅब…. 4305
- अल्ट्राटेक सिमेंट. 6600
- इन्फोसिस…….. 1907
- मारुती सुझुकी… 7559
- बजाज फिनसर्व्ह 1705
- एचडीएफसी बँक 1469
- कोटक महिंद्रा…. 1754
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1767
- एचसीएल टेक… 1163
- सन फार्मा………. 918
- स्टेट बँक…………. 493
- टाटा स्टील……. 1307
- एनटीपीसी……… 134
- हिंडाल्को………… 569
- डिव्हीस लॅब….. 4403
- पिरामल एन्टर.. 2186
- अंबुजा सिमेंट…… 299
- एसआरएफ……. 2678
- अरोबिंदो फार्मा… 668