वृत्तसंस्था/ भोपाळ
भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज नमन ओझाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा सोमवारी केली आहे. मध्यप्रदेशच्या 37 वर्षीय नमन ओझाने रणजी स्पर्धेत यष्टीमागे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम केला आहे.
2010 साली ओझाने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण लंकेविरूद्धच्या वनडे सामन्यात केले होते. वारंवार दुखापतीमुळे ओझाला क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागले होते. त्याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत एक वनडे, एक कसोटी आणि दोन टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नमन ओझाने 146 सामन्यांत 22 शतकांसह 9753 धावा जमविल्या आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैद्राबाद आणि दिल्ली डेअरडेविल्स संघांचे प्रतिनिधीत्व केले होते.