ऑनलाइन टीम / वॉशिंग्टन :
भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवताच अवघ्या 24 तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे.
मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महान आहेत. ते खूप चांगले आहेत. अशा शब्दात ट्रम्प यांनी भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक झाला असून एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधासंबंधी नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुकही केले.
ट्रम्प म्हणाले, कोरोना व्हायरस च्या उपचारासाठी मी दोन कोटी 90 लाख पेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर फोनवर चर्चा केली आणि भारतात भरपूर औषधे येणार आहेत तुम्ही निर्बंध उठवू शकता का? असे मी मोदींना विचारले. ते महान आहेत. भारतासाठी औषधांची आवश्यकता असल्याने त्यांनी हे निर्बंध घातले होते, असं ही ट्रम्प यावेळी म्हणाले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधावरून जशाच तसे उत्तर देण्याची भाषा काल केली होती.