प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यामध्ये 8 मे रोजी कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे परिचारीका प्रशिक्षणास असून नर्सिंग ट्रेनिंग स्कूल, खारेघाट रोड, रत्नागिरी येथे वास्तवास आहे, असा प्रस्ताव तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्रांऊड शेजारी, रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसर यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात येत असल्याचे विकास सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रत्नागिरी यांनी आदेशीत केले आहे.
कोरोना विषाणू बाधित क्षेत्राच्या सिमा सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे राहतील. त्यानुसार संबधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरुन येणाऱया लोकांना सदर बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ. सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना प्रतिबंध लागू राहणार नाहीत.
विस्थापित मजूर, पर्यटक, विद्याथी, यात्रेकरु व इतर व्यक्ती यांना स्थलांतरणास परवानगी दिली असली कोरोना विषाणू बाधित क्षेत्र मधून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल येईल, असे आदेशात नमूद केलेले आहे.