पालकांची जिल्हा आरोग्य विभागाला निवेदन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
चिपळूणातील संजीवनी नर्सिंग महाविद्यालयाकडून वैध नसलेले प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देवून फसवणूक करण्यात आल़ी असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आला आह़े याप्रकरणी सोमवारी पालकांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती व आरोग्य अधिकारी यांना कारवाई करण्यासंबधी निवेदन सादर केल़े
पालकांनी दिनेल्या निवेदनानुसार चिपळूण येथील संजिवनी नर्सेंग महाविद्यालय येथे 2018 ते 2020 या दोन वर्षाच्या एएनएम कोर्ससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होत़ा यासाठी महाविद्यालयाने 64 हजार 500 रूपये शुल्क आकारले हेत़े यांनतर संजिवनी नर्सिंग कॉलेजशी संबंधित असलेल्या मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल़े
मुंबईमध्sय विद्यार्थ्यांकडून 12 तास काम करून घेण्यात आल़े तसेच राहण्याची अव्यवस्था व दर्जाहीन जेवण देखील देण्यात आल़े यानंतर विद्यार्थ्यांची परिक्षा घेवून त्यांना महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र देण्यात आल़े मात्र नोकरी शोधण्यासाठी ही मुलांनी प्रयत्न केला असता हे महाविद्यालयाकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र वैध नसल्याचे सांगण्यात आल़े यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक या महाविद्यालयाकडून करण्यात आल़ी असा आरोप पालकांकडून करण्यात आले आह़े