उचगाव : बसुर्ते येथील नवग्रह ब्रह्मलिंग मंदिरामये बुधवारी भाविक भक्तांच्या उपस्थितीत मंदिराची वास्तूशांती व गृहप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रदीप हदगल, नानू कुंभार, ज्ञानेश्वर बेनके, म्हात्रू चोते, मारुती घुमटे या दाम्पत्यांच्या हस्ते मंदिरामध्ये वास्तूशांती व गृहप्रवेश कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष नेताजी बेनके, उपाध्यक्ष अरुण हण्णूरकर, घळगू बेनके, नारायण बेनके, पुंडलिक डोंगरे, संजय चोते, बापू सुर्वे, जोतिबा मेलगे, केशव नाईक, रविंद्र हुदळेवाडकर, लक्ष्मण चोते, टोप्पाण्णा गडकरी आदी मंडळी उपस्थित होती.
आज-उद्या महाप्रसाद
गुरुवारी मूर्तीन्यास कार्यक्रम तसेच देणगीदारांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम होणार असून गुरुवारी व शुक्रवारी या दोन्ही दिवशी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्कारामध्ये देणगी दिलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, ता. पं. सदस्या व ग्रा. पं. सदस्या मथुरा तेरसे, दत्त भजनी मडळ, दत्त साप्ताहिक वार्षिक फंड, माजी ग्रा. पं. अध्यक्षा व सदस्या योगिता देसाई, रमेश घुमटे, जोतिबा मेलगे, ज्ञानेश्वर बेनके यांचा सत्कार करण्यात येणार आहे.