प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे नवजात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोघा महिलांना शहर पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी फैमिदा शरीफ काझी (52, ऱा पावस रत्नागिरी) व संगिता प्रकाश शिंदे (51, ऱा संमित्रनगर रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत़ सोमवार त्यांना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े
मिळालेल्या माहितीनुसार देवरुख तालुक्यातील एका गावातील गरिब कुटुंबातील स्त्राr 14 एप्रिल रोजी पतीसोबत जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. 16 एप्रिल रोजी त्या स्त्राrने एका नवजात बालाकाला जन्म दिला व त्याच दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान तेच जन्मजात बालक दत्तक घेण्यासाठी एक मुस्लीम दांम्पत्य शहरातील एका वकिलाकडे सल्ला मागायला गेले होते. सामजिक कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयातून चौकशी केली असता मुल विकण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान संघटनांनी प्रसुती झालेल्या महिलेच्या गावातील काही प्रमुख नागरीकांशी व तिच्या समाजातील काही प्रमुखांशी संपर्क साधला यानंतर गावातील आणि समाजातील लोकांनी या महिलेला असेल त्या अवस्थेत गावात येण्याच्या सुचना केल्या मात्र तेव्हा मध्यस्थी केलेली होमगार्ड महिला आपल्याला सोडत नसल्याचे या महिलेने सांगितले. त्यामुळे या पदाधिकाऱयाने काही संघटनांना एकत्रित करून रत्नागिरी शहर गाठले. यानंतर शहरातील एका लॉजवर मुस्लीम दांम्पत्य थांबले होते. मध्यस्थि केलेल्या होमगार्ड महिलेला या संघटनांनी जाब विचारला असता या महिलेने करारानुसार ठरलेल्या रकमेची मागणी केली. अशी घटना समोर आली होत़ी
दरम्यान याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होत़ी त्यानुसार पोलिसांनी घटनेचा तपास करून दोघा महिलांना अटक करून न्यायालयापुढे हजर केल़े याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े