नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं असलं तरी काँग्रेसमध्ये सक्रिय राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्याने ते काँग्रेसमध्येच राहणार असून पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
काही दिवासांपासून पंजाबच्या राजकारणात रोज नविन बदल पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (navjyot singh sidhu) आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष (punjab congress president) नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाने राजकीय घडामोडींना सुरूवात झाली होती. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला होता. नवे मुख्यमंत्री नेमण्यात आल्यानंतरही नवज्योतसिंग सिद्धू पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाष्य केलं आहे.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Former CM Captain Amarinder Singh) आणि पंजाब प्रदेश काँग्रेस (Congress) अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वादाने राजकीय घडामोडींना सुरूवात झाली. काही दिवयांनी, “मी तुम्हाला सांगितले होते… ती एक स्थिर व्यक्ती नाही आणि पंजाब राज्यासाठी योग्य नाही,” असे अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू यांचे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी वाद सुरू होते. नंतर कॅप्टन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi Chief minister of Punjab) यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवले. यानंतर, काँग्रेसने पंजाबमध्ये सर्व काही ठीक केले आहे असे मानले जात होते. मात्र, आता सिद्धू यांनी राजीनामादिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.