अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 10 आक्टोबर 2021, स. 11.00
● वाढीचा आलेख दीडशेच्या खाली घसरला
● शनिवारी रात्री अहवालात 116 बाधित
● एकूण 6 हजार 693 जणांची तपासणी
● सात तालुके कोरोना मुक्तीच्या दिशेने
● एकूण लसीकरण 26 लाखांच्या पार
सातारा / प्रतिनिधी :
सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सवाच्या आरंभापासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाने कहर कमी केला असून, सप्टेंबरच्या अखेरीस दीडशे ते दोनशे वर स्थिर असलेली बाधित वाढ आक्टोबर महिन्यात एक-दोन दिवस वगळता ती आता दीडशेच्या खाली घसरल्याचा मोठा दिलासा नवरात्रीच्या उत्सवात मिळत आहे. गणेश उत्सवात गर्दी झाल्याने पुन्हा बाधित वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर तिसर्या लाटेचा धोकाही घोंगावत होता. मात्र अद्याप पर्यंत तरी तिसऱ्या लाटेचा काही धोका निर्माण झालेला नाही. उलट ऑक्टोबर महिन्याच्या आरंभापासून बाधित वाढीचा आलेख दीडशेच्या खाली घसरला असून गेली दोन दिवस बाधित वाढ शंभरच्या नजीक असल्याचा मोठा दिलासा जिल्हावासीयांना लाभलेला आहे.
शनिवारी रात्री अहवालात 116 बाधित
शनिवारी रात्री प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार एकूण 6 हजार 693 जणांची तपासणी करण्यात आलेली असून यामध्ये फक्त नवीन बाधित वाढ 116 एवढेच झालेली असून यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दराचा आलेख देखील दिलासादायकरित्या खाली घसरलेला आहे. नवरात्र उत्सवातील ही स्थिती कोरोना मुक्तीच्या दिशेने जाणारी दिसत असून सर्वजण दुर्गामातेच्या चरणी या कोरोनाच्या संकटातून लवकर मुक्त होऊ दे अशी प्रार्थना करत आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी वाढ दीडशेच्या खाली
ऑक्टोबर महिन्याच्या आरंभापासून बाधित वाडीचा आलेख दीडशे ते दोनशे दरम्यान स्थिर राहत होता. मात्र सात तारखेपासून तो खाली घसरलेला असून बुधवारी 186, गुरुवारी 164, शुक्रवारी 161, शनिवारी 104 व रविवारी 116 असे सलग दोन दिवस बाधित वाढ दीडशेच्या खाली व शंभरच्या नजीक राहिलेली असून कोरोना संसर्गाचा मंदावणार वेग नवरात्रीच्या दिवसात नागरिकांना दिलासा देत आहे.
शनिवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 21,40,338
एकूण बाधित 2,49,981
एकूण कोरोनामुक्त 2,40,996
मृत्यू 6,347
उपचारार्थ रुग्ण 6,296
शनिवारी जिल्हय़ात
बाधित 104
मुक्त 200
मृत्यू 05