- मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले
ऑनलाईन टीम / मुंबई :
उद्यापासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महिलांसाठी एक स्पेशल गिफ्ट देऊ केले आहे.
उद्यापासून म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून मुंबईतील सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी वेळेची मर्यादा असणार आहे. सकाळी 11 ते 3 पर्यंत आणि संध्याकाळी सात ते शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवास करता येणार आहे.
मुंबई आणि आणि एमएमआरमधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यासाठी महिलांना प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नसणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महिलांना प्रवासाची परवानगी मिळाली असली तरी पुरुषांना अजूनही लोकलने प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.