बुधवार दी. 21 ते मंगळवार दि. 27 ऑक्टोबर 2020
दि. 17 ऑक्टोबरपासून नवरात्रीस सुरुवात झालेली आहे. या काळात सर्व देवदेवता पृथ्वीतलावर असतात अशी संकल्पना आहे. त्यामुळे या काळात जितके शक्मय होईल तेवढे देवाचे पूजन करावे. त्यातही देवीचे पूजन हे सर्वश्रे÷ मानले आहे. या काळात पूजन व्यवस्थित व्हावे, पित्तप्रकोप वाढू नये, मन आनंदी व उत्साही राहावे यासाठी कोणता आहार घ्यावा? अशी विचारणा अनेकांनी केली आहे. व्हॉटसऍपवर याबाबत अतिशय सुंदर माहिती आलेली आहे. ती पुढे दिलेली आहे- या वेळेस नवरात्री आठ दिवसांची आहे, कारण नवमी व दसरा एकत्र आलेला आहे. भगवती आदिशक्तीची पूजा संपूर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. या नवरात्रीला आपल्याला खायचे आहे, भरपूर फळे, दूध, ताक आणि राजगीरा. खाण्या-पिण्याचा दिनक्रम योग्य तऱहेने होण्यासाठी वेळापत्रक दिलेले आहे. पण जागेची मर्यादा लक्षात घेऊन ही माहिती थोडक्मयात दिलेली आहे.
दररोज सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास उकळून कोमट केलेले पाणी प्यावे.
नंतर बिना साखरेचे विलायची युक्त दूध किंवा कमी साखरेचा चहा, काढा, ग्रीन टी काहीही. रोज नाश्ता करण्यापूर्वी धणे पाणी, ओवा पाणी किंवा जिरा पाणी अवश्य घ्यावे. यामुळे पचन व्यवस्थित होते, व शरीरातील विषाक्त द्रव्यांचे ज्वलन होण्यास मदत होते. फळे नेहमी ताजी घ्यावीत. तसेच फळावंर काळय़ा मिऱयाची पूड आठवणीने टाकावी. दिवस भरात अधूनमधून बिनसाखरेचे लिंबुपाणी प्यावे. दररोज रात्री झोपताना 1 ग्लास गरम गरम पाणी फुंकुन फुंकुन प्यावे. धणे पाणी, ओवा पाणी किंवा जिरा पाणी बनविण्याची कृती – दोन चमचे अर्धवट कुटलेले धणे किंवा ओवा किंवा जिरे घ्यावे. एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजू द्यावे. व सकाळी चांगले मिसळून-गाळून प्यावे. अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस हा आहारक्रम आपणास ठेवायचा आहे, हा आहार घेताना लक्षात घ्या, रोज वेगळय़ा पदार्थांची निवड आपण केली आहे, त्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्वे आपल्या शरीरात जातील व आपणास कुठल्याही प्रकारे उपवासाने अशक्तपणा येणार नाही.
राजगीरा हा पदार्थ मात्र दररोज वापरायचा आहे, कारण राजगीरा हे धान्य पचावयास खुप हल्के आहे. याने पोट तर भरते मात्र वजन वाढत नाही. शिवाय यामध्ये भरपूर मात्रेत कॅल्श्यिमचे प्रमाण आहे. राजगीरा धान्य बाजारातून आणून स्वच्छ करुन घरी त्याच्या लाहय़ा फोडाव्यात. गरम झालेल्या कढईमध्ये थोडे थोडे राजगीरा टाकत जावे व हलवित राहावे, क्षणार्धात लाहय़ा फुटतात. तसे तसे त्या बाजूला काढा. याच लाहय़ा मिक्सरमधून काढल्यास पीठ तयार होते. याचीच आपण पोळी करुन घ्यावयाची आहे. (अवघड वाटत असेल तर बाजारात तयार राजगीरा लाहय़ा व पीठ मिळते ते वापरावे.) यात साबूदाणा वा भगरीचे पीठ कालविण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारे साखरेचा वापर करु नका.
मेष –
राशीस्वामी मंगळ बाराव्या स्थानी वक्री अवस्थेत आहे. अति राग, तडकाफडकी बोलणे, अपचन, बेसुमार खर्च असे प्रकार यामुळे घडतात. दशमस्थ शनिमुळे कामाचा व्याप वाढेल. कर्तबगारी, प्रामाणिकपणा व जिद्द या जोरावर सर्व जगाला थक्क करून सोडाल. सुरुवातीला निराशा वाटली तरी नंतर उत्कर्ष निश्चित होईल. भाग्यातील गुरुमुळे मंगलकार्याच्या बाबतीत कोणत्याही अडचणी येणार नाहीत. तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. व्यसन व अतिरेक मात्र टाळावे लागतील.
वृषभ –
भाग्यस्थ शनिमुळे कार्यक्षमतेच्या बाबतीत तुमची बरोबरी कोणीही करू शकणार नाही अथवा तुमचे मुद्दे खोडू शकणार नाही. लाभातील मंगळामुळे काही महत्त्वाची कामे मार्गस्थ होतील. जागेसंदर्भातील कामे करून घ्या. मित्रांच्या बरोबर प्रवास वगैरे करताना जपून राहावे लागेल. एखाद्याची चूक अंगलट येऊ शकते. वाहन जपून चालवा. खर्च आणि कमाई यांचे गणित व्यवस्थित ठेवा. रविचे भ्रमण आर्थिक बाबतीत समाधानकारक आहे. हर्षल-रविचा प्रतियोग काही नाटय़मय घटना घडवील. त्यासाठी सावध राहा.
मिथुन –
सप्तमात गुरु आहे तोपर्यंत कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या. विवाह, भाग्योदय, प्रवास, भागिदारी, कागदोपत्री व्यवहार या सर्वबाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. दशमातील वक्री मंगळामुळे अनपेक्षितरित्या काही नको असलेल्या घटना घडू शकतात. एखादवेळेस वरच्या दर्जावरून खाली येण्याचा प्रसंग येईल. सरकारी नोकरी असणाऱयांनी विशेष सावधगिरी बाळगावी. चतुर्थातील शुक्राचे भ्रमण कौटुंबिक बाबतीत चांगले आहे. घरातील जुन्या वस्तू काढून नवीन वस्तू आणण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील वातावरण धार्मिक ठेवल्यास हा आठवडा अतिशय चांगले फळ देणारा आहे. आरोग्याच्या बाबतीत भीती घालून तुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न होईल काळजी घ्या.
कर्क –
भाग्यातील वक्री मंगळामुळे नितीबाह्य वर्तन करण्याकडे मन वळेल. अल्पबुद्धीच्या व्यक्तींपासून दूर रहा. नोकरीत कितीही कठीण प्रसंग आले तरी मन शांत ठेवा, म्हणजे पुढे समस्या उद्भवणार नाहीत. अतिदूरचे अथवा परदेशप्रवास करणे टाळल्यास उत्तम. सप्तमातील शनिमुळे विवाहाच्या वाटाघाटीच्या वेळी काही विचित्र प्रसंग निर्माण होतील. किरकोळ कारणामुळे महत्त्वाचे दस्तऐवज अथवा परमिशन वगैरे कामे खोळंबतील. त्यासाठी कुणावर अवलंबून न राहता स्वतः लक्ष घाला.
सिंह –
अष्टमातील वक्री मंगळ अचानक किरकोळ अपघात घडतील, सावध राहावे. विमापत्र, मृत्युपत्र याद्वारे काहीतरी लाभ होण्याची शक्मयता. गुरुचे भ्रमण शुभ आहे, त्यामुळे शिक्षणात उत्तम यश मिळेल. कायदा, व्यापार, अर्थशास्त्र, हवामानशास्त्र यांच्याशी संबंध नसेल तर उत्तम ग्रहमान आहे. वास्तुविषयक कोणतेही काम महिन्याभरात पूर्ण करून घ्या. त्यानंतर पुन्हा अडचणी उद्भवतील. शुक्राचे भ्रमण पैसे देईल, पण त्याच्या दुप्पट खर्च करण्यास भाग पाडील. एखाद्या कर्तबगार व्यक्तीच्या योग्य सल्याने तुमच्या जीवनात अमूलाग्र फेरबदल घडेल.
कन्या –
धनस्थानातील रवि-बुध यामुळे आर्थिक बाबतीत योग्य नियोजन करू शकाल. व्यवहारी व चतुरवृत्तीमुळे कोणत्याही गोष्टीचा चांगला प्रचार करू शकाल. चार पैसे हाती पडतील. विद्या आणि शिक्षण यांचा चांगला उपयोग होईल. सप्तमातील वक्री मंगळामुळे किरकोळ कारणावरून पती-पत्नीत खडाजंगी उडण्याची शक्मयता. त्यासाठी वैवाहिक जीवनात मतभेदांना थारा देऊ नका. आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले. तरुणवर्गाने प्रेमप्रकरणांपासून दूर राहणे आवश्यक. या सप्ताहात कोणाही अनोळखीला चुकूनही लिफ्ट देऊ नका.
तूळ –
भाऊबंदकी असेल तर कोर्ट प्रकरणाच्या मागे लागू नका. समझोत्याने प्रकरण मिटवा. कौटुंबिक वादावादी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. मंगळ वक्री आहे. आरोग्याची काळजी घ्या. कोणतेही धाडस करू नका. शनिचे भ्रमण वास्तूच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडील. बुध, रवि तुमच्या राशीतच आहेत. जे निर्णय घ्याल, ते योग्य असतील. तसेच कामाची योग्य रुपरेषा आखून ती पूर्ण करू शकाल. कुटुंबातील काहीजणांचे वागणे संशयास्पद वाटेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा.
वृश्चिक –
वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न असतील तर ते या महिन्यात सोडवा. व्यापार-उद्योग धंद्यात पुष्कळ पैसा मिळेल. जमीनजुमला, स्थावरइस्टेट या बाबतीत उत्तम योग. सरकारी नोकरी असेल तर राजयोग समजावा. रवि-बुध अनिष्ट स्थानातील भ्रमण महत्त्वाच्या कामात अडथळे निर्माण करू शकते. लग्नापूर्वीची मैत्री असेल तर तिचा वैवाहिक जीवनावर कोणताही प्रभाव पडू देऊ नका.
धनु –
विवाहाच्या वाटाघाटीत यश मिळेल. कोणताही व्यवसाय, धंदा केल्यास तो जोरात चालू शकेल. चतुर्थातील वक्री मंगळाचे भ्रमण काहीतरी गडबड, गोंधळ निर्माण करेल. त्यामुळे कौटुंबिक जीवनात अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबतीत कोणत्याही अडचणी येणार नाहीत. स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्यात नवीन सुधारणा करू शकाल. शस्त्रक्रिया व तत्सम प्रसंग उद्भवल्यास घाई, गडबड न करता चार-चौघांचा सल्ला अवश्य घ्या. कामाच्या घाईगडबडीत चुकून कुठेतरी सही करून बसाल व पुढे ते निस्तरणे कठीण होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागेल.
मकर –
तृतीयेतील वक्री मंगळामुळे कर्तबगारी वाढेल. धैर्य व बुद्धिमत्ता यांचा योग्य वापर केल्यास फार मोठे यश मिळेल. प्रवासात अपघात आणि नातेवाईकांशी किरकोळ कारणावरून वादंग असे प्रकार निर्माण होतील. रवि-बुध दशमात असल्याने नोकरी-व्यवसायात वातावरण चांगले राहील. नवीन कामे मिळण्याची शक्मयता, पण असलेला नोकरीधंदा सोडून दुसरे काही करण्याच्या फंदात पडू नका. हर्षलचे भ्रमण सुखस्थानी असल्याने कौटुंबिक जीवनात काही तरी चमत्कार घडू शकतात. केमिकल, रसायने, औषधे हाताळताना काळजी घ्या. पंचमस्थ राहुमुळे मुलांच्या समस्या सतावतील.
कुंभ –
धनस्थानी वक्री मंगळ असल्याने स्वतःच्या कर्तृत्वाने बरेच काही साध्य करू शकाल. घर, जागा, वाहन, मालमत्ता यांच्या बाबतीत उत्तम योग. पण खर्च वाढतील. एखाद्यावेळेस कर्ज काढण्याची पाळी येईल. रवि-बुधाचे भ्रमण नावलौकिक, कीर्ती, धार्मिक कार्यात यश देईल. रवि-हर्षल प्रतियोगामुळे रहाती वास्तु आणि नोकरी-व्यवसायात अकल्पित घटना घडू शकतात. शुक्र-मंगळ प्रतियोग कलावंतांना मोठे यश देऊन जाईल. पण त्याचबरोबर काही विचित्र प्रेम प्रकरणेही निर्माण करू शकेल. साडेसाती सुरू असल्यामुळे घाई गडबड न करता मन शांत ठेवूनच निर्णय घ्यावेत.
मीन –
राशीस्वामी गुरु खुश असल्याने काही गोष्टी सहज पार पडतील. न होणारी कामेही आपोआप होतील. वक्री मंगळ तुमच्या राशीत असल्याने पैसा बऱयापैकी मिळेल. पण आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. किरकोळ कारणावरुन मतभेद व त्यामुळे मनस्ताप होईल. मित्रमंडळी व नातेवाईक ऐनवेळी काहीतरी महत्त्वाचा सल्ला देऊन तुमच्या जीवनात नवा प्रकाश उजळतील. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर यश मिळेल. व्यवसाय करण्याची संधी मिळेल. आर्थिक सुधारणांच्या बाबतीत सप्ताह उत्तम आहे. काही कारणामुळे व्यवसाय अथवा रहाती जागा बदलण्याचा प्रसंग येईल, पण त्यातून काहीही नुकसान होणार नाही.