बिहारमध्ये पुरातील छायाचित्रे व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात एक वर स्वतःच्या नववधूला खांद्यावर उचलून घेत नदी पार करताना दिसून येत आहे. ही घटना बिहारच्या किशनगंज जिल्हय़ातील आहे.
किशनगंजमध्ये कनकई नदीच्या पलसा घाटावरील ही चित्रफित व्हायरल होत आहे. शनिवारी नियोजित वर शिवा कुमार सिंग लोहागाडा गावामधून वरातीसह पलसा गावात पोहोचला होता. विवाह सोहळा आटोपून रविवारी परतताना नदीचे निम्मे पात्त नौकेने पार केले, पण त्यापुढे नौका जाऊ शकत नव्हती. तेव्हा वर म्हणजेच नवऱयाने स्वतःच्या नववधूला खांद्यावर उचलून घेत नदी ओलांडण्यास प्रारंभ केला.
या प्रकाराचे तेथे उपस्थित लोकांनी चित्रण करत सोशल मीडियावर ते अपलोड केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. पलसा हे भारताचे सीमावर्ती गाव आहे. त्यानंतर नेपाळ देश आहे. याचमुळे आतापर्यंत कनकई नदीवर पूल उभारला जाऊ शकलेला नाही.
या गावात पोहोचण्यासाठी वर्षातील 6 महिने नौकेचा वापर करावा लागतो. यापूर्वीही बिहारमध्ये अशा घटना घडल्या आहेत. जून महिन्यातच बिहारच्या गोपालगंजमध्ये पूर आला असता वधूचे घर पाण्याने वेढले गेले होते. तेव्हा दोन्ही बाजूकडच्या लोकांनी समजुतदारपणा दाखवून नौकेचा वापर करत वरात काढली होती. वधूपक्षाकडून याकरता 6 नौकांची व्यवस्था करण्यात आली होती.