प्रतिनिधी/ कराड
नववर्षाचा पहिलाच दिवस येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गाजवला. शुक्रवारी सकाळी पालिकेत पावणे दहानंतर उशिरा कामावर येणाऱया लेटलतिफ कर्मचाऱयांचे ढोल ताशांच्या गजरात गुलाब आणि पुष्पहार देऊन स्वागत होऊ लागले. त्यामुळे कर्मचाऱयांसह नागरिकही अवाप् झाले. तब्बल 54 लेट लतिफांचे स्वागत करण्यात आले. कर्मचारी वेळेवर कामावर येण्यासाठी मुख्याधिकाऱयांनी केलेल्या या गांधीगिरीची चर्चा आज शहरात होती. मावळत्या वर्षास निरोप दिल्यानंतर आज उत्साहाने नववर्षास प्रारंभ झाला. मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पालिकेत उपस्थिती रोडावलेली होती. मुख्याधिकारी आज सकाळी लवकर पालिकेत दाखल झाले. 9.45 वाजता पालिकेची सर्व प्रवेशद्वारे बंद करून केवळ दक्षिणेकडील प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले. या प्रवेशद्वारातून उशिराने येणाऱया कर्मचाऱयांचे ढोलताशांच्या गजरात, गुलाब व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपमुख्याधिकारी विशाखा पवार यावेळी उपस्थित होते. अधिकारी व कर्मचारी दुपारी 12 पर्यंत कामावर येत होते. त्यांचे या पद्धतीने स्वागत करण्यात आल्याने त्यांची भंबेरी उडाली होती. काही महिला कर्मचारी उशिराने कामावर पोहोचल्या होत्या. त्यांचेही या पद्धतीने स्वागत करण्यात आले. कर्मचाऱयांच्या कामाची वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी आहे. या वेळेत कर्मचारी पालिकेत हजर असणे आवश्यक आहे. कर्मचाऱयांना वेळेवर कामावर येण्याची सवय लागण्यासाठी मुख्याधिकाऱयांनी ही शक्कल लढवली.