सोलापूर संवाद
पंढरपूर/प्रतिनिधी
लाखो वैष्णवांच्या आराध्यदैवत असणार्या विठुरायाला आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ब्लू डायमंड फुलांचा साज करण्यात आला. त्यामुळे विठोबाचे अत्यंत विलोभनीय असे दृष्य दिसून आले.
1 जानेवारी 2020 आज नववर्षाचे स्वागत सर्वत्र उत्साहात सुरू झाले. अशातच विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. त्यानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीने विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे गर्भगृह हे ब्लू डायमंड फुलांनी सजवण्यात आले. ब्लू डायमंड फुलांनी अत्यंत विलोभनीय असे दृश्य या दोन्ही देवतांचे दिसून आले. त्यामुळे साहजिकच नव्या वर्षी विठ्ठल भक्तांना अत्यंत प्रसन्न व आल्हाददायी वातावरणात विठुरायाच्या दर्शनप्रसंगी दिसले.
विठ्ठलाला यापूर्वीही वेगवेगळ्या फुलांनी सजविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी पहिल्याच दिवशी विठ्ठलाला फुलांची आरास करण्यात आली. त्यामुळे येत्या वर्षभरात देखील अजून वेगवेगळ्या फुलांची आरास विठ्ठल–रुक्मिणीच्या मंदिरात होईल याबाबतचे आता आशा उंचावल्या आहे.