ऑनलाईन टीम / शिर्डी :
नववर्षांची सुरूवात साईबाबांच्या दर्शनाने करीत साईभक्तांनी साईचरणी धनवर्षांच केली आहे. नाताळ व नववर्ष या दहा दिवसात भक्तांनी साईबाबांना सोळा कोटींचे दान देत पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
गेल्या वषी साईसमाधी शतकपूर्ती होती, त्यातुलनेत यंदा अंदाजे दोन कोटी अठृठयाऐशी लाख रुपये आधिकचे दान साई संस्थानला प्राप्त झाले आहे.
हुंडी – 9 कोटी 54 लाख
डोनेशन कांऊटर – 3 कोटी 46 लाख
चेक, डिडी, मनी ऑर्डरद्वारा – 1 कोटी 51 लाख
डेबीट/ पेडीट कार्ड – 1 कोटी 38 लाख
ऑनलाईन – 73 लाख
विदेशी चलन – 24 लाख
सोने – 1 किलो 213 ग्रॅम (किंमत अंदाजे 42 लाख)
चांदी – 17 किलो (किंमत अंदाजे 24 लाख)
शेवटच्या अकरा दिवसात – 16 कोटी 93 लाख