ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढत आहेत. आज मालिकांची ईडी कोठडी संपली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पण न्यायालयाने त्यांच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे.
दरम्यान, विशेष पीएमएलए न्यायालयाने मालिकांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मनी लॉन्डिरग प्रकरणात महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीतून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिकांना ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली असून ते कोठडीत आहेत.