ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची आणखी वाढल्या आहेत. सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती.
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपीला कोर्टासमोर रिमांडसाठी हजर करावे लागते. तसेच रिमांड करण्याआधी मेडिकल चाचणी करणे खूप गरजेचे असते. आरोपीला कोणता आजार किंवा त्रास असेल तर ते मेडिकलमधून समोर येते. कोर्टासमोर मेडिकल फिट आरोपी हजर करावा लागतो. त्यामुळे आता नवाब मलिक यांना मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले आहे. माहितीनुसार, जवळपास आजच सायंकाळी चार किंवा साडे चारच्या सुमार नवाब मलिकांना कोर्टासमोर हजर केले जाईल आणि त्यांची रिमांड घेतली जाईल. मग यापुढे जे काही पुरावे मिळतील त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या नवाब मलिक यांच्यावर प्रिव्हनेशन मनी लाँड्रिंग अॅक्ट या अंतर्गत कारवाई केली जात आहे. मलिकांना ईडीची कोठडी मिळण्याची शक्यता आहे.