13 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा – रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्टची सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रियलमीने भारतीय बाजारामध्ये आपला नवीन कमी बजेटमधील स्मार्टफोन ‘सी21वाय’ सादर केला आहे. कंपनीने यामध्ये ट्रिपल रियर कॅमेऱयासोबत 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. यासह सदरची बॅटरी रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करत असल्याची माहिती कंपनीने सादरीकरणावेळी दिली आहे.
मजबूत क्षमतेच्या बॅटरीसोबत कंपनीने सुपर सेव्हिंग मोड दिला आहे. हा मोड ऑन केल्यानंतर 5 टक्के बॅटरीत फोन 2.33 दिवसभरात स्टॅण्डर्ड बॅकअप देऊ शकणार आहे. भारतामध्ये रेडमी 9, इनफिनिक्स हॉट 10 एस आणि नोकिया जी20 यांच्यासोबत सदरचा नवा फोन टक्कर देणार आहे. सदरच्या फोनची किंमत 9 हजाराच्या आत असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भारतीय बाजारात पकड घट्ट
रियलमीने मागील काही दिवसांपासून भारतात आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या पाच कंपन्यांमध्ये रियलमीचा समावेश आहे.
रियलमीचे फिचर्स…
w 2 रॅम स्टेरेज मॉडेल खरेदी
करता येणार
w3जीबी सह 32 जीबी मॉडेल होणार उपलब्ध
w11 बेस्ड रियलमी युआय ऑपरेटिंग सिस्टम
w6.5 इंच एचडी डिस्प्ले मिळणार
wयुनीस्को टी 610 प्रोसेसरसह जी52 जीपीयु उपलब्ध