भाविकांचा उत्साह मोठा.दोन्ही पालख्या भाविकांच्या भेटीसाठी आपापल्या अधिष्ठानाबाहेर.उत्सवात फेरीवाल्यांची उपस्थिती.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोलीतील ग्रामदेवी श्री शांतादुर्गेच्या नवा सोमवार उत्सवाला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. कोवीड महामारीची परिस्थिती निवळत असताना होणाऱया या या उत्सवात भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला. यावषी गावकरवाडा, आतीलपेठ, सोनारपेठ, सर्कलच्या भागात मोठय़ा संख्येने फेरीवाल्यांनी उत्सवात आपली रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावल्याने हा संपूर्ण परिसर फुलून गेला होता. रात्री दोन्ही पालख्या भाविक भक्तांच्या भेटीसाठी आपापल्या आधि÷ानाच्या बाहेर निघाल्या.
गावकरवाडा डिचोली येथील देवी श्री शांतादुर्गेच्या मंदिरात ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. तर रात्री देवीची पालखी बाहेर निघाली. आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळातर्फे यावषीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त मठमंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी व इतर कार्यक्रम झाल्यानं?तर रात्री पालखी भाविकांच्या भेटीसाठी बाहेर निघाली.
गावकरवाडा डिचोली येथील श्री शांतादुर्गेच्या मंदिरात सकाळीपासू विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. सकाळीपासूनच मंदिरात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांग लावली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा मंदिरात देवीच्या दर्शनासाठी होत्या. रात्री देवीची पालखी सजवून बँड पथक आणि दि?डी पथकाच्या सहभागाने मंदिरातून बाहेर काढण्यात आली. व समोरील कोमुनिदाद मंडपात ठेवण्यात आली. तेथे भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले व सेवा रूजू केली.
गावकरवाडा येथे पहिली मैफल रात्री पालखी मंदिरातून बाहेर काढल्यानंतर गावकरवाडा येथील देवीच्या प्रांगणात होणार झाली. “स्वर सुमनांचे झेले” या नाटय़गीत, भावगीत, भक्तिगीत गायनाच्या बहारदार कार्यक्रमात प्रसिध्द गायक श्री जसराज जोशी (पुणे) व गायिका सौ. मनिषा निश्चल (मुंबई) आपली कला सादर केली. या कार्यक्रमाचे सूरनिवेदन टिव्ही व आकाशवाणी निवेदिका वर्षा मळीक यांनी केले.
या उत्सवातील दुसरी संगीत मैफल पहाटे देव श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात झाली. “गुंफिले स्वर फुले” या बहारदार नाटय़, सुगम, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक श्री अभिषेक मारोतकर (मुंबई) व गायिका तनिषा मावजेकर (गोवा) या आपली कला सादर करून रसिकांची मने रिजवली. या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन संगीता जोशी (मुंबई) यांनी केले.
पालखी मिरवणूक पहाटेपर्यंत परिसरातून फिरून नंतर मंदिरात परतल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.
आतीलपेठ येथील मठमंदिरात आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळातर्फे साजरा होणाऱया या वषीचा नवा सोमवार उत्सवानिमित्त मठमंदिरात सकाळीपासूनच विविध धार्मिक विधी सुरू झाल्या. येथेही भाविकंनी सकाळीपासूनच देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मोठय़ा संख्येने सुहासिनी महिलां?नी ओटी भरून आपली सेवा रूजू केली.
संध्याकाळी श्री देवी शांतदुर्गेची पालखी श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ अल्प काळासाठी ठेवण्यात आली. व नंतर पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक आतील पेठ, सोनार पेठ, भायली पेठ, बोर्डे वडाकडे येथे दाखल झाली. वडाला वळसा घालून सुं?दरपेठेतून आज (मंगळवारी) दुपारीपरँयंत मठमंदिरात पुर्ववत दाखल होणार व या उत्सवाची सांगता होणार. पालखी मिरवणुकीत मोठय़ा संख्येने भाविकांनी ओटी भरून आपली सेवा रूजू केली.
आतीलपेठ येथील या उत्सवातील पहिली संगीत मैफल आतीलपेठ मठमंदिरात झाली. त्यात प्रसिध्द गायिका सौ. दिपिका भिडे भागवत (मुंबई) व श्री धनंजय म्हसकर (मुंबई) यांनी बहारदार कार्यक्रम सादर केला. त्यांना तबल्यावर रोहिदास परब, संवादिनीवर मनोज गणपुले हे साथसंगत केली. या कार्यक्रमाचे ध्वनी संकलन सर्वेश फुलारी यांचे होते.
या उत्सवाची दुसरी संगीत मैफल रात्री गुरूफंड ट्रस्ट, भायलीपेठ येथे होणार आहे. या मैफलीत प्रसिध्द गायक श्री सुरेंद्र न. गोवेकर व सौ. भाग्यश्री आठल्ये जोशी (देवगड) यांनी गायन सादर केले. तर त्यांना तबल्यावर महेश वझे, संवादिनीवर जयेंद्र गोवेकर, पखवाज ओंकार गावकर, मंजिरीवर गोपाळ प्रभू या कलाकारांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन नितीन रावळ यांनी केले.. तर ध्वनीसंकलन नरेश नाईक यांनी केले.