जि.प.महिला बाल कल्याण समिती सभेत सूचना, वैयक्तीक लाभ योजनांचा आढावा
प्रतिनिधी/कोल्हापूर
ज्या गावांत जागेअभावी अंगणवाडीच्या इमारतीचे काम रखडले आहे, त्या ग्रामपंचायतींकडे जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, तसेच जेथे नवीन अंगणवाडी इमारतींची गरज आहे, तेथील प्रस्ताव मागवावेत अशा सूचना महिला बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले यांनी समिती सभेत दिल्या.
सभापती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महिला बालकल्याण समिती सभा पारल पडली. यावेळी महिला बालकल्याणच्या प्रकल्प अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस वैयक्तीक लाभ योजनांचा आढावा घेण्यात आला. या लाभ योजनांसाठी लाभार्थ्यांकडून प्रस्ताव घ्यावेत अशा सूचना भोसले यांनी दिल्या. जिह्यातील बाल कुपोषणाच्या विषयावर मात्र फारशी चर्चा झाली नसल्याचे समजते.
बांधकाम समितीचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे लक्ष
बांधकाम सभापती वंदना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बांधकाम समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन समितीची सभा झाली नसल्यामुळे जि.प.ला निधीच प्राफ्त झालेला नाही. त्यामुळे निधी नसेल तर विकासकामे करायची कशी ? अशी खंत समिती सदस्यांनी व्यक्त केली.