प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य सोसायटीच्या सभासदांकरिता दि. 3 एप्रिलपासून ‘लोकमान्य सुवर्ण योजने’ला प्रारंभ करण्यात आला आहे. 27 महिन्यांसाठी ही मुदत ठेव योजना असून गुंतवणूकदारांना आकर्षक असा 9.40 टक्के परतावा मिळणार आहे. ठेवीदार कमीतकमी रु. 10000/- किंवा 1 हजाराच्यापटीत जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. लोकमान्य सुवर्ण अंकुर योजनेत तिमाही व्याज मिळेल. वरि÷ नागरिक व 10 लाखाहून अधिक रुपये गुंतवणूकदारांना 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल.
गुंतवणूकदारांना मुदतपूर्व रक्कम काढावयाची असेल तर 2 टक्के कमी व्याज दराने रक्कम परत केली जाईल. या योजनेत गुंतवणूकदारांना मुदत ठेवीवर 90 टक्के कर्ज देण्यात येते.
सदर योजना 3 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 पर्यंत कार्यान्वित राहील. लोकमान्य सोसायटी ही नामांकित मल्टिपर्पज आंतरराज्य सोसायटी असून विविध समाजोपयोगी योजना विविध माध्यमाद्वारे राबवत असते. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या 213 शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व दिल्ली येथे ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या कोणत्याही शाखेस भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.