सेन्सेक्स 520 तर निफ्टी 176.65 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात गुरुवार 1 एप्रिल 2021 पासून नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला असून भारतीय शेअर बाजाराची मजबूत कामगिरीने सुरूवात झाली आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 520 अंकांनी मजबूत होत बुधवारी झालेल्या घसरणीची परतफेड गुरुवारच्या सत्रात शेअर बाजाराने केल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 520.68 अंकांनी वधारुन निर्देशांक 50,029.83 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 176.65 अंकांनी वधारून निर्देशांक 14,867.35 वर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे.
निर्देशांकात 30 मधील 25 समभाग वाढीमध्ये राहिले असून इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 4.4 टक्क्यांनी वधारले आहेत. सेन्सेक्सने ट्रेडिंगदरम्यान दिवसभरात 50,092 चा टप्पा प्राप्त केला होता. अन्य घडामोडींचा प्रभाव पाहिल्यास यामध्ये बाजारात दुपारनंतर मोठय़ा प्रमाणात समभाग खरेदी झाली. गुंतवणूकदारांनी धातू क्षेत्रातील समभागांची विक्रमी खरेदी केली असून वस्तू व सेवा करात झालेल्या विक्रमी संकलनामुळे बँकिंग, टायर क्षेत्रात मोठी खरेदी झाली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आशियाई बाजारात दुसऱया दिवशी खरेदी
हाँगकाँगचा हेंगसेंगचा निर्देशांक 561 अंकांनी वधारला आहे. दुसरीकडे चीनमधील शांघाय कम्पोजिट 24 अंकांनी तेजीत तर जपानचा निक्कोईचा निर्देशांक 248 ने वधारला आहे. टेक्नॉलॉजी समभागांच्या खरेदीमुळे अमेरिकेतील बाजार मजबूत राहिला.
नवीन बदलाचा प्रभाव ?
देशात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल रोजी झाली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात गुंतवणूक व बँकिंग संदर्भातील काही बाबी बदलणार असल्याचे संकेत आहेत. या सर्व घटनांचा परिणाम शेअर बाजारावर पडण्याचा अंदाज आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक…. 993
- कोटक महिंद्रा. 1804
- अल्ट्राटेक सिमेंट 6898
- बजाज फायनान्स 5270
- ऍक्सिस बँक….. 713
- सन फार्मा……. 610
- आयसीआयसीआय 593
- बजाज ऑटो… 3747
- ओएनजीसी….. 104
- एचसीएल टेक 1002
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1444
- स्टेट बँक………. 370
- डॉ. रेड्डीज लॅब 4587
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 806
- एचडीएफसी.. 2530
- इन्फोसिस….. 1385
- बजाज फिनसर्व्ह 9785
- एनटीपीसी…… 107
- पॉवरग्रिड कॉर्प. 218
- मारुती सुझुकी 6922
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2021
- आयटीसी…….. 220
- भारती एअरटेल 520
- एशियन पेन्ट्स 2545
- टायटन……… 1558
समभाग घसरलेल्या कंपन्या
- हिंदुस्थान युनि 2399
- एचडीएफसी बँक 1486
- नेस्ले……….. 17102
- टीसीएस……. 3165
- कमिन्स……….. 895
- एबीबी इंडिया 1397
- मॅरिको………… 407
- गोदरेज……….. 724
- डाबर इंडिया… 538
- डिव्हीस लॅब.. 3616
- ब्रिटानिया….. 3618
- पीआय इंडस्ट्रीज 2248
- कॉन्टीनिअर कॉर्प 597
- अरोबिंदो फार्मा 881
- अजंता फार्मा.. 1743
- कॅस्ट्रोल 124