सदरची सुविधा 1 ऑक्टोबरपासून – डिजिटल पेमेंन्ट प्लॅटफॉर्मला घ्यावी लागणार परवानगी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या 1 ऑक्टोबरपासून नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे. यासह बँक आणि पेटीएम, फोन पे यासारख्या डिजिटल पेमेंन्ट प्लॅटफॉर्मला कोणत्याही बिलाचे पैसे कट करण्या अगोदर संबंधीतांची मान्यता घ्यावी लागणार आहे.
सदर सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सध्याचा कार्यरत मोबाईल नंबर बँकेमध्ये अपडेट करावा लागणार आहे. असे करण्याचे कारण म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवरही ऑटो डेबिटशी संबंधीत नोटिफिकेशन एसएमएसच्या मदतीने पाठविले जाते.
काय आहे ऑटो डेबिट सिस्टम?
ऑटो डेबिटचा अर्थ आहे, आपल्या मोबाईल ऍप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये वीज बिल किंवा नेटफ्लिक्ससाठी पेमेंटसारखा कोणताही खर्च किंवा ऑटो डेबिट मोडमध्ये गेल्यास एक निश्चित तारखेला पैसे खात्यामधून पैसे कट करण्यात येणार आहेत.
एसएमएस सुविधा
नव्या व्यवस्थेसोबत बँकांना पेमेंट डय़ू डेटच्या अगोदर पाच दिवस ग्राहकांच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन पाठविले जाते. नोटिफिकेशनवर ग्राहकांची मंजुरी आवश्यक आहे.
साधारणपणे ग्राहक हे मोबाईल, पाणी बिल आणि वीजबिलासह अन्य ऑटो पेमेंट मोडवर ठेवले जाते. जसे बिल भरण्याची तारीख जवळ आल्यावर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असणाऱया खातेदारांचे पैसे आपोआप कट केले जात आहेत.