प्रशासकीय मंजुरीची मोहर; पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिह्यातील नागरीकांच्या सोयीसाठी शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 104 कोटींच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कोल्हापूर शहरांतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी खासगी जागेत कार्यरत असणारी 43 शासकीय कार्यालये या प्रशासकीय इमारतीत एका छताखाली येणार आहेत. याच्या पहिल्या टप्प्यासाठी कालच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
या संदर्भात पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : कोल्हापूर हे जिह्याचे ठिकाण असून जिल्हा स्तरावरील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, उपसंचालक नगररचना, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), प्रादेशिक सहसंचालक (साखर), वैद्यकीय अधिकारी, राज्य कामगार विमा योजना यांच्यासह 43 शासकीय कार्यालये कोल्हापूर शहराच्या विविध ठिकाणी खासगी इमारतीत भाडेतत्वावर कार्यरत आहेत. त्यासाठी प्रतिवर्षी 1 कोटी 64 लाख इतके भाडे द्यावे लागते. नागरीकांना वेगवेगळ्या प्रकारची शासकीय कामे करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात अपुऱया जागेतील शासकीय कार्यालयामध्ये जावे लागते. यामुळे नागरीकांच्या वेळेचा अपव्यय होतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन ही सर्व विखुरलेली कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचा माझा मानस होता. त्यानुसार 104 कोटींचा आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्यामध्ये 5 मजली इमारत प्रस्तावित केली आहे. त्यापैकी 2 मजले हे पार्किंगसाठी राखून ठेवले आहेत. हे दोन मजले आपत्तीच्या काळातही वापरता येणार आहेत. उर्वरीत 3 मजल्यांवर एकूण 43 शासकीय कार्यालये आहेत. प्रत्येक विभागाला सात हजार चौरस फूट जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या जागेमध्ये त्या त्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र केबीन्स, स्टोअर रुम्स व इतर सुविधा देण्यात येणार आहेत.
या इमारतीमध्ये कामासाठी येणारे नागरीक व शासकीय अधिकारी यांच्या प्रवेशाचे मार्ग वेगवेगळे ठेवण्यात येणार आहेत. वेगवगेळ्या ठिकाणी पार्किंगही ठेवण्यात येणार आहे. नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीने इतर सोयीसुविधाही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्र्यांचे आभार
3 मार्च रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार सचिव समितीच्या बैठकीमध्ये या इमारतीच्या 104 कोटींच्या आराखडय़ास प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी वित्तीय तरतुद केली आहे. प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे आभार मानले आहेत.
नवीन प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीची वैशिष्टय़ेसंपूर्ण ग्रीन बिल्डिंग असणार.
-पहिल्या टप्प्यात 200 क्षमतेचे सभागृह
-बायो डायझेस्टरचा वापर. त्यामुळे इमारतीत वापरलेले पाणी पुन्हा येथील बागेत वापरण्यात येणार.
-प्रत्येक कार्यालयात सर्व बाजूंनी प्रकाश येईल अशी रचना.
-प्रत्येक कार्यालयासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.
नवीन मध्यवर्ती प्रशाकीय इमारतीमध्ये समाविष्ट होणारी 43 शासकीय कार्यालये अशी
- भूमी संपादन विशेष अधिकारी (11), कोल्हापूर
- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर
- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), कोल्हापूर
- विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षाण), कोल्हापूर
- प्र. व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, कोल्हापूर
- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर
- जिल्हा सांख्यिकी कार्यालय, कोल्हापुर
- उपसंचालक विज्ञान व खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन कोल्हापूर
- विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ, खत नियंत्रण प्रयोगशाळा, कोल्हापूर
- जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 2. सहकारी संस्था, कोल्हापूर
- प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग
- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर
- प्रभारी वैद्यकीय अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, सेवा दवाखाना, ताराबाई रोड, कोल्हापूर
- विशेष लेखापरिक्षक वर्ग-2, सहकारी संस्था (पणन), कोल्हापूर
- जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा, कोल्हापूर
- उपसंचालक, नगर रचना, प्रादेशिक योजना, कोल्हापूर
- जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, कोल्हापूर
- तृतीय विशेष लेखापरिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था (साखर), कोल्हापूर
- न्यायाधीश, सहकार न्यायालय क्र.1 व 2, कोल्हापूर
- सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर
- सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर
- विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर
- प्रथम अप्पर विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, कोल्हापूर
- उपनिबंधक, सह. संस्था, कोल्हापूर शहर कोल्हापूर
- सहाय्यक निबंधक, सह. संस्था, करवीर, ता. करवीर
- प्रथम विशेष लेखापरिक्षक, वर्ग-2, सहकारी संस्था (साखर), कोल्हापूर
- द्वितीय विशेष लेखापरिक्षक, वर्ग-1, सहकारी संस्था (साखर), कोल्हापूर
- सह संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कोल्हापूर
- उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर ता. करवीर, जि. कोल्हापूर
- ग्रंथपाल, शासकीय जिल्हा ग्रंथालय, कोल्हापूर
- जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर
- सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर
- तालुका कृषी अधिकारी, करवीर
- उपविभागीय कृषी अधिकारी, कोल्हापूर
- सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप), कोल्हापूर
- गोदाम, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर
- वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास, कोल्हापूर
- डेप्यु. सेंट्रल इंटेलिजेन्सी ऑफीस, कोल्हापूर
- मुख्य वनसंरक्षण (वन्यजीव), कोल्हापूर
- अधीक्षक वर्ग-2, शासकीय पुरुष राजगृह, कोल्हापूर
- उप संचालक, प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर
- कोल्हापूर जिल्हा मातादी असंरक्षित कामगार मंडळ, कोल्हापूर
- प्रादेशिक मोसम विज्ञान केंद्र, कोल्हापूर