देशासाठी मजबुतीचे संकेत -सैन्य दलांशी संबंधीत उत्पादनांची निर्मिती- आत्मनिर्भर भारतअंतर्गत उत्पादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशासाठी दारुगोळय़ासह टँक व तोफांची निर्मिती करणारी ऑर्डिनेंस फॅक्टरी बोर्डच्या (ओएफबी) कॉर्पोरेटाइझेशननंतर आता 15 ऑक्टोबर रोजी दसऱयाच्या शुभमुहूर्तावर ओएफबीच्या सात वेगवेगळय़ा कंपन्यांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कंपन्यांना तीन्ही सैन्याचे आणि अर्ध सैन्यदलाकडून 65,000 कोटी रुपयाची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
ओएफबीचे एकूण 41 कारखाने आणि 70 हजार कर्मचारी आहेत, जे आतापर्यंत एका बोर्डाऐवजी सात कंपन्या म्हणजे डिफेन्स-पीएसयू (पब्लिक सेक्टर युनिट) सोबत जोडल्या जाणार आहेत.
41 कारखाने सात कंपन्यांमध्ये विस्तारणार
सर्व 41 कारखाने जे सात कंपन्यांमध्ये विस्तारीत केल्या आहेत. यामध्ये दारुगोळय़ाशी संबंधीत ‘म्यूनेशन इंडिया लिमिटेड’, रायफल, मशीनगन आणि तोफ यासारख्या हत्यारांशी संबंधीत ‘व्हेपन ऍण्ड इक्युपमेंट लिमिटेड’, टँक, बीएमपी आणि ट्रकशी संबंधीत ‘आर्मड व्हेइकल्स’, सैनिकांचे युनिफॉर्मसह टेंटशी संबंधीत ‘ट्रुप कम्फर्ट लिमिटेड’, ओप्टो इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधीत ‘ऑप्टीकल लिमिटेड’, पॅराशुट गुप आणि एनसेलेरी ग्रुपशी संबंधीत ‘यंत्र सिस्टम आणि लिडर्स इंडिया लिमिटेड’ अशा 7 कंपन्या समाविष्ट असतील.
ओएफबीचे उत्पादन वाढणार
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, कॉर्पोरेटायझेशनशी ओएफबीच्या काम करण्याच्या शैलीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये कंपन्यांना आपल्या हिशोबाने काम करण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासह काम करण्यात दक्षता व जबाबदारीही पहावयास मिळणार असून या निर्णयामुळे ओएफबीचे उत्पादन वाढीसह लाभदायक कंपन्या म्हणून उदयास येणार असल्याची माहिती आहे. आत्मनिर्भर भारतअंतर्गत भारतात निर्मितीला बळ मिळणार आहे.
कर्मचारी नियमांमध्ये कोणताही बदल नाही
केंद्र सरकारने कॉर्पोरेटाइजेशनला मंजुरी दिली असून ओएफबीच्या सर्व 70 हजार सिव्हिल डिफेन्स कर्मचाऱयांना विश्वास दिला आहे, की कोणत्याही कर्मचाऱयांची कपात करण्यात येणार नाही. सर्व 41 कारखान्यांमध्ये काम करणाऱया ए, बी आणि सी ग्रुपच्या कर्मचाऱयांना दोन वर्षासाठी या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये डेप्यूटेशनवर पाठवून दिले आहे.