बेळगाव :
नवीन होंडा हॉर्नेट 2.0 बाईक सोबत 180 सीसी मोटारसायकल सेगमेंट सोबत एंट्री केली आहे. ही बाईक जबरदस्त आणि प्रिमियम फिचर्ससोबत आली आहे. जबरदस्त फिचर्ससोबत नवीन वैशिष्टय़ेही या दुचाकीत देण्यात आली आहेत.
नवीन होंडा हॉर्नेट 2.0 बाईक सीबीएफ190आर वर बेस्ड आहे. ही बाईक प्रिमियम गोल्ड फिनिश्ड युएसडी प्रंट फोर्क्स आणि रियरमध्ये मोनोशॉक सोबत येते. बेकिंगसाठी दोन्ही व्हिल्सवर पेटल डिस्क बेक्स दिले आहेत. या बाईकमध्ये सिंगल चॅनेल एबीएस सिस्टम स्टँडर्ड फिचर रूपात येतात. नवीन होंडा हॉर्नेट 2.0 बाईक सिंगल-पेडल प्रेमवर बेस्ड आहे. होंडाची ही बाईक शार्प एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प्स, एलईडी इन्स्ट्रूमेंट कन्सोल, मस्क्मयुलर फ्युएल टँक, स्टायलिश एलॉज, इंजीन स्टॉप स्वीचसह आपल्यासमोर आली आहे.
होंडा हॉर्नेट 2.0 मोटारसायकलला नवीन 184सीसीएचईटी, बीएस-6, पीजीएम-एफ-1 इंजीन देण्यात आले आहे. हे इंजीन 8500 आरपीएमवर 17 बीएचपीची पॉवर आणि 6000 आरपीएमवर 16.1 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. ही मोटारसायकल केवळ 11.25 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटरचा वेग पकडू शकते. बाईकमध्ये पाच स्पीड गियर बॉक्स देण्यात आला आहे. नवीन हॉर्नेट 2.0 बाईक 2.047 एमएम लांबी, 783 एमएम रुंदी आणि 1.064 एमएम उंची आहे. या बाईकचा व्हिलबेस 1,355 एमएम आहे. तसेच ग्रे, निळा, लाल आणि काळा अशा चार रंगात ही बाईक उपलब्ध आहे.
ही दुचाकी नुकतीच पॅटसन होंडामध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीचे मालक राहुल पाटील यांनी या लाँच झालेल्या गाडीच्या चाव्या सर्वप्रथम ग्राहक जोतिबा मोरे यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी मॅनेजर अभिषेक मठपती व पॅटसन होंडामधील कामगारवर्ग उपस्थित होता.