नवी दिल्ली : वीज मंत्रालयाने जवळपास 15,893 कोटी रुपयाच्या 23 नवीन आंतर-राज्य ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याची माहिती नुकतीच केंद्रीय वीज मंत्री आर.के.सिंह यांनी दिली आहे. नवीन आंतरराज्य ऊर्जा प्रणालीअंतर्गत (आयएसटीएस)14,766 कोटी रुपयाच्या 13 प्रकल्पांचा विकास करण्यात येणार आहे. यासोबतच 1,127 कोटी रुपयाच्या दहा अन्य प्रकल्पांचे काम हाती घेतले जाणार आहे.
नवीन प्रकल्प : सरकारकडून सुरु करण्यात येणाऱया नव्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये राजस्थानमध्ये 14 गीगावॅट क्षमतेचा प्रकल्प, गुजरातमध्ये 4.5 गीगावॅट, मध्यप्रदेशात 1 गीगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश असणार आहे.