मुंबई
हय़ुंडाईची नवी आय ट्वेंटी 2020 ही कार बाजारात दाखल होण्याविषयीची गुप्तता अखेर संपली आहे. ही गाडी बाजारात दाखल होण्याच्या तारखेची वाट ग्राहक पाहात होते. अखेर कंपनीची ही नवी करकरीत गाडी 5 नोव्हेंबरला बाजारात दाखल केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल आणि टर्बो इंजिनच्या पर्यायासह ही गाडी दाखल होणार असून 6 एकेरी आणि दुहेरी रंगाच्या पर्यायासह ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.