प्रतिनिधी/ बेळगाव
गवत गंजीला लागलेली आग विझविताना झालेल्या वादावादीतून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा नवी गल्ली, शहापूर येथे ही घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
अरिहंत जक्कण्णावर (वय 29, रा. नवी गल्ली, शहापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री त्याला मारहाण झाली आहे. शनिवारी या संबंधी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नाही. शुक्रवारी रात्री गवत गंजीला लागलेली आग विझविताना क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीतून तरुणाला मारहाण झाली असून या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.