प्रतिनिधी/ बेळगाव
नवी गल्ली, शहापूर येथील बलभीम व्यायाम शाळेसमोर गल्लीतील बालचमुंनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यावेळी तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले. नितेश शिगेहळ्ळीकर, अतीश गवळी, स्वराज्य अनगोळकर, निश शिंदे, पार्थ गुंडाण्णाचे, मोहित शिंदे, गौरी काजोळकर, आशिका शिंदे, अजिंक्य शिंदे, सर्वेश शिगेहळ्ळीकर आदी उपस्थित होते.