ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय नौदलाच्या मिग-29 के या प्रशिक्षणार्थी विमानाच्या अपघातानंतर बेपत्ता झालेला पायलट कमांडर निशांत सिंगचा आज 11 दिवसांनंतर मृतदेह सापडला.
26 नोव्हेंबरला नौदलाचे मिग-29 के हे प्रशिक्षणार्थी विमान गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कोसळले होते. या विमानात दोन पायलट होते. या दुर्घटनेतून एक पायलट बचावला होता. तर बेपत्ता निशांत सिंगचा शोध घेण्यासाठी किनारपट्टीभागात नौदलाच्या बोटी आणि विमाने तैनात करण्यात आली होती. मागील 11 दिवसांपासून निशांतचा शोध सुरू होता. आज त्याचा मृतदेह हाती आला.
गोव्याच्या किनारपट्टीवरील अरबी समुद्रात बेपत्ता मिग-29 विमानाचा काही कचरा सापडला असून, त्यात टर्बो चार्जर, फ्युएल टँक इंजिन, विमानाचे विंग इंजिन यांचा समावेश असल्याचेही नौदलाने म्हटले होते.