मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनच्या काळाचा सर्वच ऑटो कंपन्या मोठय़ा धिटाईने सामना करत आहेत. मारूती सुझुकी कंपनीही आपल्यापरीने स्पर्धेत राहण्यासाठी प्रयत्न करते आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनी उत्सवी काळात नवी सेलेरियो बाजारात उतरवण्याची तयार करते आहे, असे समजते. उत्सवी हंगामात ही ग्राहकांना मोठी भेट असेल, असे सांगितले जात आहे. नवी सेलेरियो येत्या ऑक्टोबरमध्ये भारतीय रस्त्यावर उतरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्सवी काळात कार विक्रीवर जोर देण्यासाठीची तयारी कंपनीने केलेली आहे. उत्सवी हंगामात कार विक्रीला प्रतिसाद मिळण्याची आशा कंपनीने व्यक्त केलीय. नव्या गाडीत अनेक बदल केले जाणार आहेत, असे कळते. या नव्या गाडीची सध्या चाचणी सुरू असल्याचे समजते. पहिल्या गाडीपेक्षा या नव्या गाडीचा आकार अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.