प्रतिनिधी /नवे पारगाव
नवे पारगाव
(ता. हातकणंगले)
येथील बालकाचा विहिरीत
बुडून मृत्यू झाला. वरद
विकास बंडगर (वय
५) असे या मृत
बालकाचे नाव आहे. ही
घटना रविवारी (दि.26)
दुपारी दोनच्या सुमारास
घडली. वडगाव पोलिसात
नोंद झाली आहे.
याबाबत
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली
माहिती अशी की, विकास
लक्ष्मण बंडगर हे नवे पारगाव
(ता. हातकणंगले)
येथील बाळूमामा मंदिरा
नजीक कुटुंबासह राहतात.सकाळी
पत्नी व मुलगा वरद यांना घेऊन
ते पाडळी रस्त्या नजीक असणाऱ्या
शेतात ऊसाची भांगलण करायला
गेले होते. आई वडील
शेतात भांगलण करीत असताना
वरद हा शेताच्या जवळ खेळत बसला
होता. काही वेळे
नंतर शेतात काम करत असणाऱ्या
विकास यांच्या पत्नीच्या
निदर्शनास मुलगा आला नाही.
तेव्हा त्यानी विहिरीकडे
धाव घेतली.
खेळत
खेळत तो शेताच्या जवळ असणाऱ्या
काशीम बारगीर यांच्या विहिरीकडे
गेला होता.विकास
यांनी विहिरीत तात्काळ उडी
मारली व वरद यास बाहेर काढले.
मात्र बुडून त्याचा
मृत्यू झाला. शवविच्छेदन
नवे पारगाव च्या ग्रामीण
रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी
शहा यांनी केली. पोलीस
नाईक अमर पावरा व पोलीस कर्मचारी
राजेश पाटील अधिक तपास करीत
आहेत.