सांगरूळ /प्रतिनिधी
कुस्तीच काय प्रत्येक खेळात खेळाडूंना चढ-उतारांस सामोरे जावे लागते. येणाऱ्या अडचणी वर मात करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर सातत्याने प्रयत्न करा, चांगली कामगिरी करून नवोदित मल्लांनी महाराष्ट्राचे नाव देशात व देशाबाहेरही उज्वल करावे असे आवाहन राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते मल्ल डी वाय एस पी राहुल आवारे यांनी केले कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्यावतीने कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय महामेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .अध्यक्षस्थानी अर्जुनवीर पै.काकासाहेब पवार होते.
यावेळी बोलताना राहुल आवारे यांनी आपल्या लेखनीतून महाराष्ट्रातील होतकर कुस्तीगीरांना प्रसिद्धी देऊन महाराष्ट्रातील अनेक कुस्तीगीरांना मोठे करण्याचे काम कुस्ती मल्लविद्या महासंघांच्या माध्यमातून पै. गणेश मानुगडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने करत महाराष्ट्राच्या कुस्तीच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले.कुस्ती क्षेत्रात मला कुस्ती-मल्लविद्या महासंघाने नेहमीच पाठबळ दिले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कुस्तीचे आराध्या दैवत बजरंग बली हनुमान ,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेअर्जुन काकासाहेब पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . स्वागत महाराष्ट् कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केले .
प्रास्ताविक करताना कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पैलवान गणेश मानुगडे यांनी कुस्ती मल्लविद्या महासंघाची ध्येय धोरणे व कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या स्थापनेपासूनचे कार्य सांगितले .
कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते संग्राम कांबळे यांनी यावेळी बोलताना राजर्षि शाहू महाराजांच्या योगदानामुळे भारतातील कुस्ती सातासमुद्रापार गेली आहे. कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या नगरीत कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा पहिला मेळावा होत आहे . हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले .
२००९ ला कुस्ती-मल्लविद्या महासंघाची स्थापना झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरात पोचवण्याचा प्रयत्न केला आहे .कुस्ती मल्लविद्या महासंघाची अधिकृत नोंदणी केली आहे. लॉक डाऊनच्या काळात फेसबुकच्या माध्यमातून अनेक नामवंत वस्ताद यांच्या सहकार्यातून होतकरू पैलवानाना मार्गदर्शन केले आहे कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतर पैलवानाना स्वतःच्या पापावर उभे राहण्यास मदत केली आहे. उपेक्षित पैलवान व उपेक्षित वस्तादाना समाजापुढे आणण्याचे काम कुस्ती-मल्लविद्या महासंघाने केले असल्याचे सांगितले .
प्रमुख पाहुणे काकासाहेब पवार यांचा सत्कार कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पैलवान गणेश मानुगडे यांच्या हस्ते केला. अर्जुनवीर पैलवान राहुल आवारे यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांचे हस्ते केला. तसेच सर्व उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा सत्कार कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी बोलताना.कुस्ती निवेदक शंकरराव पुजारी, बाबाराजे महाडिक, कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे कार्याध्यक्ष सागर साळुंखे,पै .राजाभाऊ देवकाते ,आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती कोच अश्विनी बोराटे ,हिंदकेसरी संतोष वेताळ डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ,यांनी कुस्ती-मल्लविद्या महासंघच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कुस्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कुस्ती- मल्लविद्या महासंघाच्यावतीने सम्राट लाल मातीचा पुरस्कार पैलवान सिकंदर शेख ( ता . गंगावेश ) ,समाज भूषण पुरस्कार सिध्देश्वर गायकवाड ,कुस्ती मल्लविद्या भूषण पुरस्कार बाबाराजे महाडीक, उत्कृष्ठ कुस्ती प्रचारक राहूल जाधव ,कुस्तीमल्लविद्या सारथी संग्रामसिंह कांबळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कुस्तीकोच पी जी पाटील ,आंतरराष्ट्रीय मल्ल सोनबा गोंगाणे,आंतरराष्ट्रीय मल्ल सौरभ पाटील, केसरी चित्रपट अभिनेते विराट मडके व भरत लिमन,विशेष महिला प्रेरणा पुरस्कार
अनिता जयवंत पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .आदर्श वाचतात पुरस्काराने विठ्ठल पाटील (वाकरे ) पै .यशवंत मोरे रंगराव कळंत्रे यांचे सह जिल्ह्यातील अनेक नामवंत वाजता जाणार आदर्श वस्ताद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
असे सांगितले. यावेळी हिंदकेसरी संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, पुणे जिल्हा अध्यक्ष महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, बंडा पाटील रेठरेकर, महान महाराष्ट्र केसरी माणीक पवार, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील यांचेसह राज्यभरातील आजी माजी कुस्तीगीर वस्ताद कुस्ती शौकीन उपस्थित होते.