मागील काही महिन्यांपासून प्रति कार्ड खर्चातही घसरण
नवी दिल्ली ः फेब्रुवारी महिन्यात देशातील नवीन क्रेडिट कार्डची संख्या मोठय़ा प्रमाणात घसरली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्या माहितीनुसार मोतीलाल ओसवाल फायनॅन्शिअल सर्व्हिसेसने म्हटल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात देशात 5.49 लाख नवीन क्रेडिट कार्ड सादर करण्यात आले आहेत. एक वर्षापूर्वी समान कालावधीत यामध्ये 4 टक्क्यांची घसरण राहिली होती.
डिजिटल पेमेन्ट्स ट्रकर यांच्या अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्ड सादर करण्यात मोठा हिस्सा नोंदवला आहे. यांचा बाजारातील वाटा 36.1 टक्के राहिला आहे तर 18.1 टक्क्यांच्या हिश्यासह स्टेट बँक पेडिट कार्डमध्ये दुसऱया स्थानी असून 18 टक्क्यांसोबत ऍक्सिस बँक तिसऱया स्थानी राहिली असल्याची माहिती आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये क्रेडिट कार्ड सेगमेंटमध्ये आयसीआयसीआय बँकेची हिस्सेदारी 32.4 टक्क्यांसोबत सर्वोच्च स्थानावर राहिली आहे.
मासिक खर्चात घसरण
प्राप्त अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये पेडिट कार्डच्या आधारे करण्यात येणाऱया मासिक खर्चात मोठी घसरण राहिली आहे. यामध्ये फेब्रुवारीत पेडिट कार्डचा सरासरी खर्च हा 9,800 रुपयावर राहिल्याची माहिती आहे. मागील चार महिन्यात हा आकडा 10,500 ते 11,000 रुपयापर्यंत राहिला होता.
प्रतिकार्ड खर्चातही घसरण
ऍक्सिस बँकेला वगळता अधिकतर बँकांच्या प्रतिकार्ड खर्चात घसरण राहिली आहे. एचडीएफसी बँक, स्टेट बॅक कार्ड आणि सिटी बँकेचा प्रति कार्ड खर्च हा 1200 ते 1500 इतक्या रुपयानी घसरला आहे. तर अन्य बँकांच्या प्रति कार्ड खर्चात हलकीशी घसरण राहिली आहे. ऑनलाईन बँकिंगमध्ये काही अडचणींमुळे एचडीएफसी बँकेवर नवीन पेडिट कार्ड सादर करण्यावर निर्बंध लादले आहेत.