महिलांसाठी लढणार कायदेशीर लढाई
महिलांच्या समस्या आणि गरजा योग्यप्रकारे केवळ एक महिलाच समजू शकते. कारण महिलेने स्वतःच्या जीवनात या आव्हानांना आणि समस्यांना कधी ना कधी तोंड दिलेले असते. पण प्रत्यक्ष स्वरुपात याप्रकरणी काम करणारे खूपच कमी लोक आहेत. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा अशा निवडक लोकांमध्ये सामील आहे. नव्याने एक संस्था सुरू करत महिलांची कायदेशी लढाई लढण्याचा विडा उचलला आहे.
नव्याने इन्स्टाग्रामद्वारे स्वतःच्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे. तिच्या संस्थेचे नाव ‘न्यारी’ आहे. महिलांना न्याय मिळावा असे वाटत असल्यास आम्हाला मजबूत व्हावे लागणार आहे. तसेच त्यांच्या अधिकारांसाठी उभे रहावे लागेल. याचमुळे आम्ही विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे नव्याने म्हटले आहे.
नव्याच्या चाहत्यांनीही कॉमेंट करत तिचे मनोबळ वाढविले तसेच तिच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे. नव्याने यापूर्वी भारतात लिंग असमानतेवरून ‘हर सर्कल’ नावाने एक डिजिटल मोहीम सुरू केली होती. तसेच ‘निमाया’ नावाने एक प्रकल्प सुरू केला आहे, याचा उद्देश महिलांचा कौशल्य विकास करणे आहे.