गणेशाच्या आगमनाने वातावरणात एक अनोखं चैतन्य पसरतं. अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना मात्र डोळे भरून येतात. सध्या प्रत्येक जण विघ्नहर्त्या गणरायाकडे एकच मागणं मागतोय सर्व दुःखांचा नाश होऊ दे आणि ह्या कोरोनारुपी संकटातून बाहेर पडून सर्वाचं जीवन सुरळीत सुरु होऊ दे. अनंत चतुर्दशीला आता दुःखांचं विसर्जन आणि सुखाचं आगमन झालं आहे कारण, या अनंत चतुर्दशीला झी मराठीवर ‘नव्या नात्यांचा श्री गणेशा’ होणार आहे. नव्या नात्यांच्या बांधू गाठी म्हणत झी मराठी वाहिनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल 5 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणून त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली. रविवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीला ‘नव्या नात्यांचा श्री गणेशा’ हा विशेष कार्यक्रम झी मराठी प्रेक्षकांसाठी सादर केला. ‘नव्या नात्यांचा श्री गणेशा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आणि या निमित्ताने अनेकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यासाठी या कार्यक्रमाने हातभार लावला. त्यामुळे खऱया अर्थाने नव्या नात्यांचा श्रीगणेशा झाला. या कार्यक्रमातून प्रहसन, गाणी आणि डान्स हे सगळंच प्रेक्षकांसाठी सादर झाले. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील लाडक्या विनोदवीरांनी निर्मिती ताईंसोबत या कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्याचसोबत अंकिता लोखंडे, सोनाली कुलकर्णी, अक्षया देवधर, नेहा खान, अस्मिता देशमुख यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्याचसोबत सलील कुलकर्णी, नंदेश उमप, अभिजीत सावंत यांचे सुमधुर परफॉर्मन्सेसने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.
Previous Article…रशियाच्या माखोव्हवर चार वर्षांची बंदी
Next Article 300 कोटी रुपयांची ‘शत्रू संपत्ती’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.