मुंबई
जपानमधील कार निर्माती कंपनी टोयोटाने नवी फॉर्च्यूनर गाडी भारतीय बाजारात सादर केली आहे. सदरच्या गाडीसाठी पाच हजार जणांनी बुकिंग केले असल्याचे टोयोटाकडून सांगण्यात आले. टोयोटा किर्लोस्करने फॉर्च्यूनरच्या बुकिंगला प्रारंभ केल्यानंतर जवळपास पाच हजार जणांनी गाडी घेण्यासंदर्भात बुकिंग केले असल्याचे समजते. कंपनीने सदरच्या गाडीचा पुरवठा करण्याचे नियोजन विपेत्यांच्या माध्यमातून सुरू केले आहे. सुधारीत फॉर्च्यूनर गाडी आणि लिजेंडर या गाडीसाठी ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात चौकशी होताना दिसली. गाडीसंदर्भात सर्व ती माहिती कंपनीने ग्राहकांना योग्य पद्धतीने पुरवली आहे. ग्राहकांना नव्या सुव्ह गटातील गाडीचा अनुभव लवकरात लवकर घेता यावा यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. टोयोटाचा सुव्ह गटातील बाजारातील वाटा 53 टक्के इतका असल्याचे समजते. बोल्ड स्टाईल आणि आधुनिक सुविधांमुळे ही फॉर्च्यूनर गाडी अनेकांच्या पसंतीची राहिली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताच असल्याचे कंपनीने म्हटले आहे.