दिवसभरात 41,157 नवे बाधित ः 518 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसात 40 हजारांच्या आत असणारा दिवसभरातील बाधितांचा आकडा पुन्हा चाळीस हजारांच्या पुढे गेला आहे. देशात गेल्या 24 तासात 41 हजार 157 कोविड रुग्ण आढळून आले आहेत. याचदरम्यान कोविडचे 518 रुग्ण दगावल्याने मृतांची एकूण संख्या 4 लाख 13 हजार 609 इतकी झाली आहे. देशातील सध्याची सक्रिय कोरोनाबाधित संख्या आता 4 लाख 22 हजार 660 इतकी झाली असून सक्रिय रुग्णांचे प्रमाण आता 1.36 टक्के इतके झाले आहे.
आतापर्यंत देशात 3 कोटी 11 लाख 6 हजार 65 इतक्या रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे. एकंदर रुग्णांपैकी कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 कोटी 2 लाख 69 हजार 796 इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात 42 हजार 4 इतक्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
दरम्यान, देशातील लसीकरणाच्या संख्यने आता 40 कोटींचा टप्पा गाठला असून लसीकरण झालेल्यांची संख्या आता 40 कोटी 49 लाख इतकी झाली आहे.
17 जुलैला दिवसभरात 51 लाख 1 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 44 कोटी 39 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात 19.36 कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्मयांहून कमी आहे.