कोविडनंतर कर्मचाऱयांना ऑफिसमध्ये परत आणण्याचे प्रयत्न
कोरोना महामारी संपुष्टात आल्यावरही कार्यालयांमधील कामकाजाचे वातावरण पूर्वीसारखे राहणार नाही हे आता निश्चित आहे. जगभरातील तज्ञ कोरोनात्तर वर्क कल्चर (कार्यसंस्कृती)वर अध्ययन करत आहेत. अनेक तज्ञांनुसार वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून वर्क फ्रॉम होमसोबत जुळवून घेतल्यावर कंपन्यांना स्वतःच्या कर्मचाऱयांना परत ऑफिसमध्ये बोलाविण्यासाठी पूर्ण ऑफिसचा कायापालट करण्याची आवश्यकता भासू शकते.
ऑफिस स्पेसमध्ये सहानुभूती आणि सहकार्यावर भर राहणार आहे. लोक सर्वप्रथम, गतिशील आणि उद्देशपूर्ण कार्यस्थळ आणि प्रयोगाची संस्कृती या तत्वांना बळ द्यावे लागणार आहे. कर्मचाऱयांना पुरेसा नैसर्गिक प्रकाश मिळतोय का? त्यांचे काम सोपे आणि सुविधाजनक करण्यासाठी कुठली व्यवस्था आहे हे पहावे लागणार असल्याचे उद्गार बुटिक फर्म पेपरस्पेस एशियाच्या संस्थापिका नरिता चियाह यांनी काढले आहेत.
पेपरस्पेस एशियाने चालू महिन्यात सिंगापूरच्या नॅशनल डिझाइन सेंटरमध्ये भविष्यातील कार्यालयांचे सादरीकरण केले होते. तेथे व्हिजिटर बैठक व्यवस्था, लायटिंग, साउंड उपकरणे आणि अन्य फर्निचर पाहिले जाऊ शकते. या कार्यालयांमध्ये सर्वाधिक भर स्पेश एफिशिएंसीवरून होता.
भारतातील स्थिती
भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये कंपन्या रिमोट वर्किंगवरून कुठली भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल. अनेक कंपन्या आता कर्मचाऱयांना ऑफिसमध्ये बोलावत आहेत. तर काही कंपन्या फ्लेक्सिबल वर्किंग मॉडेलवर काम करण्याची अनुमती देऊ शकतात, किंवा हायब्रिड मॉडेलही अवलंबिले जाऊ शकते, ज्यात निम्म्या लोकांना ऑफिसमध्ये बोलाविले जाऊ शकते. तर निम्म्या जणांना घरातून काम करण्यास सांगितले जाऊ शकते.