वृत्तसंस्था/ पॅरीस
2020 टेनिस हंगामातील सोमवारी येथे पहिल्या ताज्या एटीपी मानांकन यादीची घोषणा करण्यात आली असून पुरूष एकेरीत अनुक्रमे स्पेनचा नादाल, सर्बियाचा जोकोव्हिक आणि स्वीसचा फेडरर यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले आहेत.
या ताज्या एटीपी मानांकन यादीत स्पेनचा नादाल 9985 गुणांसह पहिल्या, सर्बियाचा जोकोव्हिक 9055 गुणांसह दुसऱया, स्वीसचा फेडरर 6590 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिएम 5825 गुणांसह चौथ्या, रशियाचा मेदव्हेदेव 5705 गुणांसह पाचव्या, ग्रीसचा सिटसिपेस 5300 गुणांसह सहाव्या, जर्मनीचा व्हेरेव्ह 3345 गुणांसह सातव्या, इटलीचा बेरेटेनी 2870 गुणांसह आठव्या, फ्रान्सचा भोनफिल्स 2530 गुणांसह नवव्या आणि स्पेनचा बॉटिस्टा 2335 गुणांसह दहाव्या स्थानावरआहेत.