वार्ताहर/ खडकलाट
2020 साल हे संपूर्ण जगालाच लक्षात राहणार वर्ष म्हणून ओळखलं जात आहे. या वर्षात एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली नव्हती. पण येणाऱया नव्या वर्षात सन 2021 मध्ये तब्बल 3 अंगारकी संकष्ट चतुर्थी आल्याने गणेश भक्तांना ही एक पर्वणीच ठरणार आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱया संकष्ट चतुर्थीसाठी गणेश भक्त वाट पाहत असतात. या दिवशी दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी पहावयास मिळते. या सरत्या वर्षात 2020 मध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी न आल्या कारणाने व कोरोना महामारीच्या काळात सर्वच मंदिरे बंद असल्या कारणाने गणेशभक्तांतून नाराजी पसरली होती. पण आता कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यावषी 2 मार्च, 27 जुलै आणि 23 नोव्हेंबर या तीन दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्थी आली आहे.