ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटने जगभरातील इतर देशांप्रमाणे आता भारताचीही चिंता वाढली आहे. कोरोना व्हेरिएंटचा हा घातक प्रकार रोखण्यासाठी भारत सरकारने दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, हाँगकाँग आणि बोत्स्वाना सह 12 देशांची नावे जाहीर केली आहेत, ज्या ठिकाणांहून येणाऱ्या विमान प्रवाशांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच या सर्व प्रवाशांना भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
यापूर्वी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (एनसीडीसी) असे म्हटले आहे की, तीन देशांमध्ये कोरोना व्हेरिएंट बी 1.1.529 (ओमिक्रॉन) ची काही प्रकरणे समोर आली आहेत. बोत्स्वानामध्ये तीन, दक्षिण आफ्रिकेत सहा आणि हाँगकाँगमध्ये एका प्रकरणाची नोंद झाली आहे.