नवी दिल्ली
होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया (एचएमएसआय) यांनी आपल्या 184 सीसीच्या नव्या सीबी 200 एक्स बाईकचे वितरण भारतीय बाजारात सुरु केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या बाईकची किंमत 1 लाख 44 हजार रुपये इतकी असून गेल्या महिन्यामध्ये सदरची गाडी लाँच करण्यात आली होती. फरिदाबादमध्ये पहिल्या ग्राहकाने सदरची गाडी खरेदी केली आहे. अनेक विक्रेत्यांकडे सदरच्या गाडीविषयी ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात विचारणा होत आहे.