नवी दिल्ली
होंडा कार्स इंडियाने आपली नवी कोरी झॅज बाजारात उतरवण्याची योजना आखली असून याकरीता प्रीबुकिंगला सुरूवात केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. होंडा कार्स इंडियाने नवी झॅज स्पोर्टी शैलीत बनवली असून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्यात असेल. बीएस-6 श्रेणीवर आधारीत ही गाडी 1.2 लि. आय-व्हीटीइसी पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्स्मीशन तत्वावर बाजारात येणार आहे. यात अनेक जागतिक स्तराची सुरक्षिततेची वैशिष्टय़े असणार असून वन टच इलेक्ट्रीक सनरूफ सुविधाही खास असेल.