वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव तालुक्यातील निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुकांची धावपळ चालली आहे. मतदारांना अनेक आमिषे दाखवून दिली जात आहेत. माजी सदस्य प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैशाची आमिषे दाखवून प्रसंगी दांडगाई करून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, जाणकार मतदारांनी जुन्या उमेदवारांना घरी बसवून नव्या होतकरू उमेदवारांना निवडून देण्याचा चंग बांधला आहे. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्या 27 जागांसाठी 89 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीच्या दिवशी 15 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
मंगळवार दि. 22 डिसेंबर रोजी होणाऱया ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण 115 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते. छाननीमध्ये 11 अर्ज बाद झाले. माघारीच्या दिवशी एकूण 15 सदस्यांनी माघार घेतली तर 5 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. आता 27 पैकी 22 जागांसाठी एकूण 104 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीमधील प्रभागातील उमेदवारांची संख्या आणि इच्छुक उमेदवार प्रभाग 1- जागा 3 – उमेदवार 9 माघार 3, प्रभाग 2 – जागा 3 – उमेदवार 11 माघार 4, प्रभाग 3 – जागा 2 – उमेदवार 10 माघार 1, प्रभाग 4 – जागा 2 उमेदवार 7 माघार 1 बिनविरोध 1, प्रभाग 5 – जागा 2 उमेदवार 1 माघार 1 बिनविरोध 1, प्रभाग 6 – जागा 2 उमेदवार 6, प्रभाग 7 – जागा 4 उमेदवार 4, प्रभाग 8 – जागा 4 उमेदवार 4 माघार 2, प्रभाग 9 – जागा 4 उमेदवार 3, प्रभाग 10 – जागा 1 उमेदवार 6 माघार 2, प्रभाग 11 – जागा 1 – उमेदवार 5 माघार 1, प्रभाग 12 – जागा 3 उमेदवार 9 बिनविरोध 1, प्रभाग 13 – जागा 2 उमेदवार 4 बिनविरोध 1, प्रभाग 14 – जागा 2 उमेदवार 8 बिनविरोध 1.
कंग्राळी ग्राम पंचायतमधील बिनविरोध उमेदवार
प्रभाग 5 – उमेदवार विनायक जयवंत कम्मार
प्रभाग 4 – उमेदवार सुनीता सुरेश जाधव
प्रभाग 14 – उमेदवार गिरीजा सुरेश सुतार
प्रभाग 13 – उमेदवार दोड्डव्वा सिद्धाप्पा माळगी
प्रभाग 12 – उमेदवार जनाबाई सतीश गुडगेनहट्टी
मतदानपूर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून डी. व्ही. कांबळे, ग्राम विकास अधिकारी रावजी एम. फगरे, राजू गुरव यांच्यासह लेखापाल किसन हदगल यांनी काम पाहिले.