महेश पाटील, मधू पाटील, महेश सिद्धानी, व्ही. टी. कुकडोळकर यांचे योग्य मार्गदर्शन
उमेश मजुकर /बेळगाव
नव्वदीच्या दशकात खो-खोमध्ये बेळगावचे नाव शिखरावर पोहोचले. शामला पाटील, वंदना पाटील, शांता गडकरी, मंगल पाटील, कीर्ती पाटील यांनी राखलेला दबदबा नंतरच्या महिला खो-खोपटूंनी अबाधित राखला आहे. राधिका पवार, वात्सल्या दुधनी, चंद्रभागा पाटील, सविता आजरेकर, आरती काकतीकर, सुकांती पाटील, अंकिता पाटील, कृतिका पाटील व कीर्ती पाटील यांनी परंपरा कायम ठेवत युनिव्हर्सिटी, कर्नाटक राज्य संघात त्याचप्रमाणे ज्युनियर राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. राधिका, वात्सल्या दुधनी यांनी खेलो इंडिया संघात स्थान मिळविले आहे.
मधू पाटील, वाय. सी. गोरल, महेश सिद्दानी, महेश पाटील, व्ही. टी. कुकडोळकर यांनी पूर्वीच्या महिला खो-खोपटूंनी जपलेली परंपरा सध्याच्या महिला खेळाडूंना घेऊन खो-खोची परंपरा जीवित ठेवली आहे. राधिका पवार व वात्सल्या दुधनी या दोन्ही खेळाडू 21 वर्षाखालील खेलो इंडिया पुणे संघात सराव करीत आहेत. चंद्रभागा पाटील, सविता आजरेकर, आरती काकतीकर, सुकांती पाटील, अंकिता पाटील, कृतिका पाटील व कीर्ती पाटील या खो-खोपटू बी. के. महाविद्यालयात शिकत असून, या सर्व खेळाडू राणी चन्नम्मा विद्यापीठ खोखो संघातून खेळून आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. आता शहरातील महिलांचे खो-खो थोडे कमी झाले आहे. पण ग्रामीण भागात महिलांच्या खो-खोला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या खो-खोपटूंनी आपल्या प्रशिक्षकांच्या सर्व तांत्रिक बाबींचा उपयोग करून कौशल्यात वाढ केली आहे. कृष्णाताई कदम, माया कदम, चांगुणा काटके, रंजना कदम, मल्लव्वा मेलगे, नलिनी पाटील, भारती पाटील, अमिता पाटील, मिलन कोळेकर, आशानंद चोपडे, रेखा सुतार, मंगल गुंजीकर, माया सुतार, संगीता सुतार, रेखा पाटील, बेबी असलकर, दया मोरे, हेमा पाटील, सृष्टी कारवारकर, कल्पना पाटील, स्मिता अनगोळकर, सुलभा गुणाजी, नूतन राजाध्यक्ष, वंदना पावशे, सुजाता हलगेकर, मिरा पाटील, विद्या पाटील, चंद्रा पाटील, सुवर्णा पाऊसकर, अरूणा कुलकर्णी, स्नेहल अष्टेकर, मनिषा कदम, सुनंदा वैद्यण्णावर, वीणा पोरवाल, सविता साकरिया, उशा साकरिया, कविता मजुकर, वनिता बिर्जे, उज्वला बिर्जे, आशा देवगेकर, रेश्मा शिंदे, स्वाती चोळाप्पाचे, मिथुना बेंचण्णावर, रेणु किल्लेकर, गुड्डी मुरकुटे, राजी कावळेकर, मधा धामणेकर, शितल देसाई, लता धामणेकर, शितल पाटील, अनुसया अनगोळकर यांनी यश मिळविले.
मधू पाटील (राष्ट्रीय खो-खो पंच, ज्येष्ठ प्रशिक्षक)
सध्याच्या महिला खेळाडूंना सर्व सोयी सवलती मिळत आहेत. राष्ट्रीय खो-खोपटूंना खेळाच्या आधारावर सरकारी नोकऱया मिळत आहेत. त्याचा पुरेसा फायदा मात्र अजुनही खेळाडूंनी उठविलेला नाही. महिला खो-खोपटूंनी त्या दृष्टीने विचार करावा. पूर्वीच्या अनेक महिला खो-खोपटूंनी खेळाच्या जोरावर नोकऱया मिळविल्या. त्या आता मोठय़ा हुद्यावर रूजू आहेत. अलीकडे खो-खोचे प्रस्थ थोडे कमी होत चालल्याने क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंना हेरून खो-खो खेळण्यास प्रवृत्त करावे, तरच खो-खोचा दर्जा उंचावेल.
राजकुमार पाटील (ज्येष्ठ खो-खोपटू)
लहानपणापासूनच माझ्या क्रीडा शिक्षकांनी मला चांगले मार्गदर्शन केले. नियमित सरावामुळे आमच्या जीवनाला चांगले वळण लागले. शारिरीक आणि बौद्धिक चपळता वाढविण्यासाठी खो-खो मैदानावर सरावादरम्यान वेळ घालवत होतो. यश आणि अपयश दोन्ही सहन करण्याची शक्ती या खेळामुळेच मला मिळाली. त्यासाठीच मी मेडिकल मार्केटिंगसारखे आव्हानात्मक क्षेत्र निवडले, जेथे रोज जिंकावेच लागते. असे क्षेत्र निवडण्याचे धाडस या खोखोमुळे मिळाले. तसेच मार्गदर्शक वाय. सी. गोरल सर यांच्यामुळेच हे गुण माझ्या अंगी भिनले.
कै. के. डी. काटकर (ज्येष्ठ प्रशिक्षक व पंच)
के. डी. काटकर हे आंबेवाडी गावचे सुपुत्र. शालेय जीवनापासूनच खो-खो व कब्बडी या दोन्ही खेळात आपली चमक दाखवली. भगतसिंग स्पोर्ट्स क्लबमधून खेळताना अनेक पराक्रम त्यांनी करून दाखविले. त्यांनी आपल्या शिक्षकी पेशात अनेक दिग्गज खो-खोपटू, कब्बड्डीपटू, थ्रोबॉल व व्हॉलिबॉलपटू घडविले. ते प्रख्यात खो-खो पंच होते. त्यांचे निर्णय अचुक असल्यामुळे त्यांच्या निर्णयाला मान देत होते. असे हे अष्टपैलू क्रीडा शिक्षक के. डी. काटकर यांचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
कै. के. के. पाटील
कडोली गावचे प्राथमिक विभागाचे विषयशिक्षक, पण खेळाबद्दल अतिशय आवड असलेले शिक्षक म्हणून ख्यातनाम असलेले के. के. पाटील सर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी शामल पाटील, शांता गडकरी, मंगल पाटील, वंदना पाटील या महिला खो-खोपटूंना घडविले. त्याचप्रमाणे अनेक खो-खोपटूंनाही त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या निधनाबद्दल क्रीडाक्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला.
ऍड. एम. एम. पाटील -(बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघटनेचे अध्यक्ष)
बेळगाव जिल्हय़ातील खो-खोपटूंनी जिल्हय़ाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे अशा खो-खोपटूंना वाव देणे आपले प्रथम कर्तव्य असून, पुढील काळात या खेळाडूंना वाव देण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणार असून, त्यामुळे परराज्यातून आलेल्या खो-खोपटूंचे कौशल्य आपल्या खो-खोपटूंना शिकावयास मिळेल. त्याचप्रमाणे खो-खो शिबीर भरवून ज्ये÷ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन बेळगावच्या खो-खोपटूंना देण्याचा संकल्प बांधला आहे.